छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेल्या आवाहनानुसार इको फ्रेंडली क्लब तर्फे विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ घेतली .
वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे . प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून आपण पर्यावरणाचे मित्र म्हणून विद्यार्थ्यांनी संदेश वाहक म्हणून कार्य करावे , असे प्रतिपादन इको फ्रेंडली क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले .
यावेळी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी. एन .जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ दिली . याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 12