ग्रामीण पत्रकार संघास” यंदा पंचवीस वर्षे पूर्ण याच पार्श्वभूमीवर रोप्य महोत्सवाच मुंबईत आयोजन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी
महाराष्ट्रात ग्रामीण पत्रकारांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या “ग्रामीण पत्रकार संघास” यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, याच पार्श्वभूमीवर रोप्य महोत्सवाच आयोजन मुंबईत करण्यात आला आहे.
यानिमित्य महाराष्ट्रात विविध माध्यमात काम करणाऱ्या होतकरू, निडर आणि धडाडीच्या पत्रकारांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतिवीर बळवंत फडके सभागृहात येत्या 23 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पुरस्कारासाठी नोंदणी करता येणे सहज शक्य असून नोंदणी करिता महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या फेसबुक पेज अथवा इन्स्टाग्राम पेज अथवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष गजानन वाघमारे (95037 09112 ) यांना संपर्क साधावा.
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुखातिथी म्हणून दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे , विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *