पाडवा ..

Khozmaster
1 Min Read
स्वागत  पाडव्याचे
नववर्षाची सुरवात
वर्षाव  शुभेच्छांचा
समस्त राहे सुखात
विक्रमादित्यविजय
केला शका निःपात
काल गणना प्रकार
शकसंवत अंमलात
दिवाळसण सुसंपन्न
दीपलक्ष उजळतात
औक्षण रे जावयाचे
नातेसंबंध जुळतात
कणकेचा दिवा नवा
कृषक घे  मडक्यात
शेणाचा बळी  शुभा
स्थापना  धडाक्यात
राज्य ये बळीराजाचे
पूर्व  पार  मना‌मनात
लोक कल्याण कारी
राजा सु प्रिय जनात
मांडा आर्थिकहिशेब
वह्यांचे पूजन संहिता
साडेतीन मुहूर्तांपैकी
सुखक्षण करे सांगता
झाले गेले ते गंगार्पण
स्वागतम्  नव हर्षात
करे काही अलौकिक
अद्भुत  ते नव वर्षात
– हेमंत मुसरीफ पुणे.
   ९७३०३०६९९६
0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *