प्रतिनिधि बार्शीटाकली
शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकली अंतर्गत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संदीप मालवे केंद्र प्रमुख डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली महान केंद्रातील सर्वच शाळांमध्ये दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले काही शाळांमध्ये आकाश कंदील निर्मिती तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ड्रायफूटचे वितरण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा निंभारा येथे मुख्याध्यापक विजय टपके व सर्व सहायक शिक्षकांनी दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ड्रायफूट चे पाकीट बनून वर्ग एक ते आठ मधील सर्व विध्यार्थ्यांना वितरण केले यासाठी शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, देवचंद नानोटे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून .सरपंच नितेश खरात. दादाराव नानोटे. निलेश खरात मुख्याध्यापक ,विजय टपके हे होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संदीप पालवे, गजानन भगत आदींनी सहकार्य केले तसेच जिल्हा परिषद शाळा कासमार येथे. मुख्याध्यापक गजानन गोतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश साबळे मनीषा सूर्यवंशी मॅडम यांनी आकाश कंदील स्पर्धाचे आयोजन केले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले व उत्कृष्ट आकाश कंदील बनविले तसेच जि प शाळा बिहाड माथा महान येथे मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच जि प शाळा महान मराठी वाघा वस्तापुर येथे सुद्धा विविध कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये मुख्याध्यापक शिवशंकर अस्वार मुख्याध्यापक सुरेखा भोपाळे मुख्याध्यापक सुशीलाताई महाकाळ मुख्याध्यापक मोहन देविदास तराळे मुख्याध्यापक शंकर पिलात्रे आदींनी आप आपल्या शाळेत कार्यक्रमा चे आयोजन केले होते,
महान केंद्रातील शाळा मध्ये दिवाळी निमित्त आयोजित सर्वच उपक्रम कौतुकास्पद आहे.सदर उपक्रम विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे
विनोद पिंपळकर
विस्तार अधिकारी शिक्षण
पंचायत समिती बार्शीटाकली
Users Today : 12