सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी : संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहात साजरा होणारा दिवाळी हा सण मुंबई व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. अभ्यंगस्नान…दिवाळी पहाटचे कार्यक्रम… दिव्यांची आरास… नवीन कपडे… नवीन दागिने… आकर्षक पणत्यांची रोषणाई… आणि चमचमीत फराळाच्या सहाय्याने घराघरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिवाळी सणाची चाहूल लागताच अनेकांच्या मनात उत्साहाची कारंजी थुईथुई नाचू लागतात. कारण दिवाळी सणाला नवीन कपडे, दागिने व वस्तूंची रेलचेल असते. नरकचतुर्दशीचे अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे तीन ते चार दिवस दिवाळीचा उत्साह घरोघरी असतो. दिवाळी हा लहानथोर सर्वांना आवडणारा सण आहे. रविवारी दिवाळी असल्याने शनिवारची रात्रभर जागून अनेक घरांमध्ये सजावट करण्यात आली.
*व्यापाऱ्यांचे लक्ष्मीपूजन*
दरवर्षी कार्तिक अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो . लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने निद्रिस्त भाग्यही जागृत होते. दिवाळीच्या रात्रीला महानिषाची रात्र असेही म्हणतात. असे म्हणतात की, या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. ज्याला दिवाळीत लक्ष्मीदेवीकडून ऐश्वर्य आणि समृद्धीचे वरदान मिळवायचे असेल तर त्याची प्रार्थना नक्कीच मान्य होते. माता लक्ष्मी ही संपत्ती आणि संपत्तीची देवी आहे. लक्ष्मी मातेच्या उपासनेने धनाची प्राप्ती होते. लक्ष्मीच्या पूजेने केवळ धनच नाही तर नाव आणि कीर्तीही मिळते. दिवाळीत सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायानिमित्त चोपडीचे पूजन केले. घराघरातही लक्ष्मीपूजन करण्यात आले. प्रसाद म्हणून लाह्या व बत्तासे वाटण्यात आले. तसेच मिठाईचेही वाटप करण्यात आले.
Users Today : 11