सोयगांव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियाना दिवाळी निमित्त कृषि किटचे वाटप

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगांव तालुक्यातील दि. १ जानेवारी २०२३ ते सप्टेंबेर २०२३ या कालावधीतील कर्ज, नापिकी, नैराश्य आणि अशा विविध कारणांमुळे आत्महत्या केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मा. मंत्री कृषि यांच्या संकल्पनेतून तथा माणुसकीच्या भावनेतून महाराष्ट्र कृषि विकास महामंडळ व कृषि मालावर प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने वाटप करण्याचे नियोजन प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर बी. एस. तौर व प्रकल्प उपसंचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर अनिल कुलकर्णी यांचे मार्फत करण्यात आले आहे.
त्यानुसार सदरील किटचे तालुकस्तरीय वाटप दिवाळी आगोदर आज रोजी मौजे किन्ही, पळसखेडा, सोयगांव व नांदागाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अमोल महाजन व गावातील सरपंच, उपसरपंच, प्रतिशील शेतकरी व पत्रकार यांच्या हस्ते  करण्यात आले.
0 9 4 8 3 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *