हरविलेल्या भावंडांचा असाही दीपोत्सव समतोल प्रकल्पाची कामगिरी

Khozmaster
3 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव: दि : १२ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मी पूजन दिवशी.
                मुंबईहुन रात्रीला                        दिवाळीला  गावी (जळगाव जामोद )ला वडिल दोन्ही लहान बालकांना गावी घेऊन येत असताना  रेल्वेत चडतांना भाऊ गर्दीत अचानक वडिलांकडून बालकांचा हात सुटला .व आधाराला पारखी झालेली ही   आठ व पाच  वर्षाचे दोन्ही भावंड चुकून जळगावचे रेल्वे स्थानक येऊन पोहचले. यावेळी जळगाव रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे लोहमार्ग पोलीस दलाचे रामराव इंगळे  व समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील हे  रेल्वे स्टेशन प्लॉट फॉर्म क्र ३ वर आउटरीच करीत होते . त्यावेळी ही दोन्ही बालके  हे विना पालक फिरताना यांना दिसून आले. या बालकांना विचार पुस केली असता , बाबा सुटले असे म्हणू लागले. तेव्हा बालकांना  आपलेसे करून बालकांना ऑफिसला आणून अधिक माहिती काढत मेडिकल करत , दोन्ही बालकांना काळजी व सुरक्षासाठी बाल कल्याण समितीच्या आदेश्याने बालगृहात दाखल करण्यात आले. पण  मुलांची  दिवाळी ही परिवाराच्या  समवेत व्हावी , ते लवकर घरी पोहचावे . यासाठी भरकटलेल्या आयुष्याची नजर वेचण्यात तत्पर असणाऱ्या समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील व  बाल कल्याण समिती सदस्य सौ. वृषाली जोशी मॅडम यांना वाटत होते. मुलांकडे संपर्क नंबर असून देखील लागत नव्हते. पण तेथील काही मित्रांच्या माध्यमातून प्रदिप पाटील यांनी शेवटी त्या बालकांच्या  परिवाराची माहिती काढून या बालकांचे घर शोधण्यास यश मिळवलं . आईने रडून हंबरडा फोडला. माय  माणुसकीचे ‘सुवर्ण’ पण अनुभवण्यासाठी , पोटच्या लेकरांना घेण्यासाठी चार तासात  जळगाव बालगृह गाठले .
        माणुसकीचे दर्शन घडवत     जळगाव येथील बालकल्याण समिती, बालगृह , लोहमार्ग पोलीस पथक व  केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या कुशीतून दोन्ही भावंडे आज दिवाळीच्या दिवशी घर वापसी झाले. आता राम व श्याम ( नावं बदवलेले ) ची दिवाळी आई बाबांच्या परिवाराच्या कुशीतच होणार ,  जातांना परिवाराच्या चेहऱ्यावरचा आनंद भरून दिसत होता, यावेळी बालकांच्या परिवाराने संस्थेच्या व कर्मचारी यांना पुढील  वाटचालीला शुभेच्छा दिल्या. राम व श्याम यांनी ही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व  मामा आमच्या घरी चला अशी आशा व्यक्त केली.
                  या वाट चुकलेल्या बालकांना पुन्हा कुटुंबाशी जोडण्यासाठी माणूस म्हणून जगविण्यासाठी समतोल प्रकल्प नेहमी  चोवीस तास तत्पर राहत असतो , या कार्याबद्दल  प्रशासना कडून कौतुक होत आहे.
0 9 4 8 3 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *