छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,११
वैजापूर चे भूमिपुत्र ऑननरी कॅप्टन सोमनाथ रामदास
गायकवाड यांनी लागोपाठ ३०वर्ष देशाच्या बिविध सीमावर्ती भागात जाऊन प्राणांची बाजी लावून सीमा रक्षण केले,देश रक्षण केले, नुकतेच ते सेवा निवृत्त झाले,त्यांचा सेवा पुर्ती सोहळा व भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा गायकवाड वाडीच्या नागरिकांनी शनिवार(ता,११)रोजी केला,या प्रसंगी अध्यक्षस्थान नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, होत्या आ,रमेश पा,बोरनारे यांनीही थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले पुतळा परिसरात मिरवणुकी दरम्यान कॅप्टन सोमनाथ गायकवाड यांचा सत्कार केला,देशाच्या सीमांचे रक्षण करतांनाचे अनेक प्रसंग सोमनाथ गायकवाड यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले,आ,बोरनारे व शिल्पाताई परदेशी,एकनाथ जाधव यांनी ही त्यांच्या देशसेवेचे कौतुक करत आता आरोग्यदायी जीवन जगून राहिलेले सामाजिक,कौटुंबिक, व राष्ट्रीय कार्य करावे असा सल्ला दिला,आई भीमाबाई गायकवाड, वडील रामदास गायकवाड व पत्नी सौ,सविता सोमनाथ गायकवाड यांच्याकडे वेळ द्यावा असेही सुचविले,प्रास्ताविक अनिल शहाणे यांनी केले तर,कार्यक्रमाचे सूत्र संचलन व aआभार धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,तर गायकवाड वाडी सरपंच दौलत गायकवाड,माजी सभापती सजनराव गायकवाड, रतीलाल गायकवाड, जगन गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,प्रास्ताविक
अनिल शहाणे यांनी केले,माजी सैनिक संघटना वैजापूर चे अध्यक्ष संदीप जगधने,अर्ध सैनिक संघटनेचे सचिव गौतम गायकवाड ,तसेच तुकाराम गायकवाड, सोपान गाढे,बाळू मोरे,तसेच दशरथ बनकर,अरुण होले, सरपंच बोरसर,फकीरा पवार, याशिवाय नबी पटेल,बाबासाहेब गायकवाड, रवी गायकवाड, रेखा जोशी, यांची उपस्थिती होती,दीपक रामदास,व सुनील गायकवाड,माजी सैनिक नाना जाधव,ज्ञानेश्वर गायकवाड, दत्ता गायकवाड यांनी सहभाग नोंदविला सेवा पुर्ती मिरवणूक डॉ,आंबेडकर पुतळ्या पासून निघाली होती शेवटी गायकवाडवाडी येथे संपली,
यांची उपस्थिती होती,
Users Today : 11