छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,१३
वाढते प्रदूषण,अस्वच्छता, व वायू प्रदूषण याचे भान ठेवत दिवाळी च्या सणात कोणत्याही प्रकारचे फटाके न घेता येथील जैन जागृती पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या फटाक्याच्या पैशातून दिवाळी फराळ एक ते दीड किलोचे पॅकेज येथील देवीचे मंदिर परिसरातील १०० छोट्या मुलांना व प्रत्येक आदिवासी घराला एक किलो मिठाई पॅकेज रविवार(ता,१२)रोजी वाटून त्यांचे समवेत दिवाळी साजरी केली, शिक्षक राजेंद्र संचेती व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी या मुलांना आवाहन केले होते यांनीही मिठाई वाटली यांच्या समवेत जैन सोशिएल ग्रुप यांनी ही सहकार्य केले निलेश पारख,संतोष संचेती प्रा,जवाहर कोठारी,श्री,हिरण, श्री,पारख ही यात सहभागी झाले होते,जैन जागृती शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने फटाक्यांच्या पैशातून गोर गरीब,दीन, दुबळे,आदिवासीना व पालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळी मिठाई वाटप करण्याचे हे अकरावे वर्ष आहे,राज्यातील ईतर सामाजिक संस्थांनी
जैन जागृती पाठशाळेचा आदर्श गिरवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन राजपूत यांनी केले(फोटो कॅप्शन-गोरगरीब आदिवासी मुले यांना व घरोघरी जाऊन मिठाई वाटप)
Users Today : 11