ज्ञानाचा दिवा लावू तिथे

Khozmaster
1 Min Read
अज्ञानाचा दाटला अंधःकार जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
महापूर व्यसनांचा वाहतो जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
आळस रुतून बसला जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
भेदाभेद नांदतो जिथे जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
दंगली हिंसाचार घडतो जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
रुढी अनिष्ट जपतात जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
अन्याय अत्याचार घडतो जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
असत्याचा होतो जयकार जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
श्रमाचे चालले शोषण जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे
राष्ट्रहिताचा र्हास चालला जिथे
ज्ञानाचा दिवा लावू तिथे@ आनंदा वारांगणे सर तथा कवी मोलखेडा ता सोयगाव.
0 9 4 8 3 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *