गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना जिल्ह्यातील मंठा शहर हे नावाजलेल असणारे आजकाल खुप प्रसिद्ध होत आहे. मात्र नुसते गावाचे नाव मोठे होत असुन गावातील ग्रामस्थांना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे धड गावात नीट नाटकी सार्वजनिक स्मशानभूमीची नाही.
मंठा शहरा जवळ पास १२० खेडे आहेत या खेड्यातील लोक व माता भगिनी कपडे, किंवा ईतर वस्तू खरेदी करण्यासाठी मंठयाला यावे लागते सार्वजनिक बाथरूम, नसल्याने ग्रामीण भागातील माता भगिनी कुंचबना होत आहे
गावात सार्वजनिक शौचालयाची सोय नाही, नळाला पिण्यासाठी पाणी दूषित येत असून शुद्धीकरण यंत्र फक्त नावालाच आहे. गावातील खांब्यावर बसवलेले बल्प (हायस्मार्ट फोकस) हे अतिशय खराब दर्जाचे असुन आणखीन ते बसवून काही देखील दिवस झाले नाही तोवरच ते बंद पडलेले आहेत. त्यातच गल्लीतील पाणी सोडण्यासाठी केलेले प्रत्येक चौकातील वॉल ची देखील
आजकाल खुप वाईट अवस्था झालेली निदर्शनास येत आहे. काही खड्ड्यावरील बसवलेली ढापे हि तुटलेली आहे तर काही खड्ड्यावर ढापेच नाही यामुळे मोटर सायकल चे चाक किंवा मोठ्या गाडीचे चाक त्या खड्ड्यात जाऊन आत्ता पर्यंत अनेक अपघात झालेले आहेत मात्र तरीही त्याचाकडे मंठा नगरपंचायतच लक्ष देत नाही.
Users Today : 10