शिवसेना नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवस निमित्त रुग्णालयांमध्ये फळ वाटप.

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
 
 
नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवस निमित्त शिवसेनेचे सरपंच व युवा सेनेच्या वतीने रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
    शासकीय जिल्हा रुग्णालय, छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल निम्स हॉस्पिटल मध्ये सकाळी शिवसेनेच्या सरपंचांच्या वतीने फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
   यावेळी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक रवींद्र पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक मराठे,निंभेलचे सरपंच दीपक पाटील, खामगावचे सरपंच राजेश वसावे, धांडण्याचे उपसरपंच नितीन नागरे,तलवाडे खुर्देचे माजी उपसरपंच कृष्णा राजपुत, दहिंदुले बु.सरपंच राजेश वळवी,दहिंदुले खु.राजेश विजय पाडवी, उपसरपंच देवा राजपुत आदी उपस्थित होते.
    युवा सेनेच्या वतीने देखील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
      यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी रुग्णांची विचारपूस करीत त्यांना फळ वाटप केले.यावेळी युवासेनेचे जिल्हा उपसंघटक पंकज चौधरी,दगा चौधरी,सुनील चौधरी,मुकेश घरटे,संतोष महाराज देवलालिकर,सुरेश साळवे,आकाश कृष्णा चौधरी, सजन साठे,जयेश  चौधरी,मोती भरवाड,प्रल्हाद माळी,ओम माळी,भूषण इशी, पवन सावंत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे जिल्हा उपसंघटक पंकज चौधरी यांनी केले होते.
0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *