दिवाळी अमावस्या
महत्व असे अनन्य
लक्ष्मी पूजा घरोघर
धरोवर हो शतधन्य
निर्धना वाटावे धन
कमला पूजा संपन्न
सार्थक लक्ष्मीपूजन
देवता होईलं प्रसन्न
कायसांगते दिवाळी
भुकेल्या द्यावे अन्न
तृप्त हो अंतीमक्षणी
जोअसेलं मरणासन्न
द्या चारा जनावरांना
भरभरुन पिके धान्य
माती फुलविते मोती
अभिषेक करे पर्जन्य
तिजोरी बंदिस्त नोटा
श्रीमंती उपयोग शून्य
उचीत करी विनियोग
सहयोगी हो अन्योन्य
दारिद्रयतिमीर संपवी
क्षणी विरे औदासिन्य
जगत होणारं श्रीमंत
पळूनजाई औदासिन्य
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
Users Today : 10