वाशिम प्रतिनिधी ; दी.१२ नोव्हेंबर, नुकत्याच संपन्न झालेल्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद राज्यस्तरीय उपक्रम युवकानं साठी राबविण्यात जात आहे. याकरिता 36 जिल्ह्यातून 72 संसद प्रतिनिधी येणार आहेत. त्यापैकी 24 प्रतिनिधी हे मंत्रिमंडळ कार्य पाहणार असून उर्वरित संसद सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.यामध्ये ग्रामीण भागातील वाशिम जिल्ह्यच्या तालुक्यातील ग्राम. व्याड येथील सामाजिक कार्यकर्ता समाजकार्य विद्यार्थिनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कुमारी आकांक्षा ज्ञानबा गायकवाड यांची युवा संसद लोकसभेच्या खासदार सदस्य पदी निवड झाली.तर येत्या 19 व 20 नोव्हेंबरला राज्याचे राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये व नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र- गोवा राज्य समन्वयक प्रकाश जी मनवरे व युनिसेफ महाराष्ट्र समन्वयक
उपस्थितीमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यातील अभिरूप युवा संसद ही राजधानी मुंबई येथील विद्यापीठ कॅम्पस कलीना कॅम्पस सांताक्लूज येथे संपन्न होणार आहे.२ दिवस चालणाऱ्या या संसदेत विधिमंडळ राजभव भेटीसह युवा संसद युवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. कु.आकांक्षा गायकवाड यांची खासदार पदी निवड झाल्याने नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा युवा आधिकरि आशिष पंत व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण संस्था केकतउमरा अध्यक्ष सर्व सदस्य, आणि राष्ट्रीय सेवा योजना पथक सरनाईक समाजकार्य महाविद्यालय आजी माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.भारती देशमुख मॅडम, प्रा. डॉ.मनिषा कीर्तने,प्राचार्य प्रा. डॉ किशोर वाहने,प्रा.डॉ प्रसेनजीत चिखलीकर व आई-वडील नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 10