पणती दिवाळीची
घरा,घरात पेटवू
बंधूत्वाचा संदेश
हृदया,हृदयात जागऊ
वाद,प्रतीवादाने
ना कुणाचे भले
याने भल्या,भल्यांचे
राज्य लयाला गेले
दिवाळी पणती समोर
सगळे असती समान
सर्वधर्म समभावाची
उभारू नवी कमान
दिवाळीची पणती
देते आम्हा संदेश
समतेचा असावा
सर्वत्रच उपदेश
दिवाळीच्या पणतीची
ज्योती जगी न्यारी
प्रेम,आपुलकीने
नांदावी सारी,सारी
दिवाळीच्या पणतीचा
मान आपण ठेऊ या
बंधू भाव जागवून
दिवाळी साजरी करू या—–
धोंडीरामसिंह ध राजपूत,वैजापूर, जि, औरंगाबाद
मो९४२१३१२२४४.
Users Today : 10