सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे गावापासून पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हजरत घोडेस्वार बाबा ईमाम बाबा यांचा दर्गा आहे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दि १०/११/२३ शुक्रवार रोजी घोडेस्वार बाबांचा येथील सावळदबारा टिपू सुलतान मोहल्ला रहिम पठाण यांच्या राहत्या घरातुन निंघते सुरत गुजरात येथील शेख अशरफ शेख भिकन यांची चादर व सावळदबारा शब्बीर मो सरवर येथिल या सजावटीची चादर फुलांची चादर, अत्तर बिर, यासह चंदनाचा लेप याला संदल म्हटले जाते आणि या संदलाची मिरवणूक संपूर्ण गावातुन प्रभात फेरी मार्गाने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती आणि सकाळी हजरत घोडेस्वार बाबा यांच्या दर्गा मैदानात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील हिंदू, मुस्लिम भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
हजरत घोडेस्वार बाबा दर्गाच्या संदल-उरुस निमित्ताने परिसरातील व गावातील समाजबांधव एकत्र येऊन उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण होत असल्याचे, प्रतिपादन शेख सलीमभाई मंडप वाले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . लुखमान मो शरीफ माजी सरपंच यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते . स्वयंपाक बनवायचा काम श्रीराम महाजन यांनी केले. गांवातील हाकेच्या अंतरावर असलेल्या हजरत घोडेस्वार बाबा दर्गाचा सालाबादप्रमाणे संदल-उरुस मोठ्या आनंदात साजरा झाला. याप्रसंगी सुरत येथील उद्योजक रईस प्लास्टिक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.सलीमभाई इम्रान भाई लाईटिंग वाले सुरत रऊपखाॅन सुरत, शकील पठाण,सुरत, फिरोज पठाण सुरत, सगीर पठाण सुरत, शेख आसिफ शेख अय्युब,शेख सांडू शेख इस्माईल,सांडू खा दाऊदखाॅ पठाण,मो.रफीक मो शब्बीर, उद्धव बाळासाहेब शिवसेना तालुका संघटक गुलाबराव कोलते, सरपंचपती शिवाआप्पा चोपडे, उपसरपंच मोहम्मद आरिफ दिनकरराव देशमुख आदीं हिंदू व मुस्लिम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दर्गावर फुलांची चादर, गलेफ, सुवासिक अत्तर, लोबान, संदल चढविण्यात आले. यावेळी फातेहा पठण होऊन प्रसाद वाटप करण्यात आले. दर्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रसिद्ध सनईवादक व ढोलताशे सुरुतवाले,सनई चौघडाने सावळदबारा परिसर मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी गावातील व परिसरातील मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा दर्गा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजरत घोडेस्वार बाबा यांच्या मिरवणूकीत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिट जमादार मिरखाँ तडवी, प्रकाश कोळी, भरत कोळी व पोलीस पाटील विलास कुल्ली यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संदल कमेटी तर्फे सलीम भाई मंडप यांनी गावकऱ्यांचे आभार मानले
Users Today : 10