वैजापूरच्या तीन गणेश मंडळांना व दुर्गा नवरात्र उत्सव मंडळांना प्रशंसापत्र प्रदान

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद /वैजापूर ता,११
गणेशोत्सव दरम्यान व नवरात्र उत्सव दरम्यान महाराष्ट्र
शासनाने ठरवून  दिलेल्या  नियमांचे  पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोख्याचा ,सामाजिक शांतीचा संदेश दिल्याबद्धल जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळ,नवरात्र दुर्गा मंडळ याना शुक्रवार(ता,१०) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना,संदीपान भुमरे,छत्रपती संभाजीनगर चे आ,प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,व जिल्हा पोलीस प्रमुख मनीष कलवानिया, अतिरिक्त पोलीस प्रमुख सुनील
लांजेवार यांच्या हस्ते प्रशंसा पत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालय येथे प्रदान करण्यात आले,वैजापूर चा प्रथम क्रमांक सिद्धनाथ गणेश मंडळ,द्वितीय श्री स्वामी समर्थ गणेश मंडळ,तृतीय खंडाळा येथील जय श्रीराम गणेश मंडळ याना मान्यवरांनी प्रशंसापत्र दिले,परीक्षक धोंडिरामसिंह राजपूत,पियुष मालपाणी,खंडाळा निलेश घोडेकर यांनी ही प्रशांसापत्र स्वीकारली तर उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस पाटील बाबासाहेब बहिरट,बाबासाहेब हरिश्चंद्रे, खंडाळा पोलीस पाटील  बागुल,यांना ही प्रमाणपत्र देण्यात आले,या प्रसंगी वैजापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल विनायक केदार  व पो,कॉ,ज्ञानेश्वर मेटे,वैजापूर यांची ही उपस्थिती होती,याच कार्यक्रमात
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जमा झालेला मुद्देमाल पांच कोटी नव्वद लक्ष  रुपये किमतीचा मूळ मालकांना परत करण्यात आला,ना,भुमरे यांनी पोलिसांठी विश्रांती भवन बांधण्यासाठी डीपीडिसी मधून दोन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले,जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस आश्वासन दिले,जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,उत्कृष्ट गणेश मंडळ पदाधिकारी, व पोलीस पाटील  उपस्थित होते,
0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *