प्रा अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वन पर भेट

Khozmaster
1 Min Read
बार्शीटाकळी शहरातील नगरपंचायत चे गटनेता तथा माजी नगरसेवक सुनील विठ्ठल राव शिरसाट यांचे मोठे
 वडीलधारी बंधू अनिल विठ्ठलराव शिरसाट यांच एका दीर्घ आजाराने 4/11/2023 रोजी निधन झाल. याच्या अचानक निघून जाण्याने शिरसाट परिवारात दुःखाच डोंगर कोसळलं.
आज दि 10/11/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या मातृतुल्य प्राध्यापक *अंजलीताई आंबेडकर* आणि वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे महासचिव *मिलिंद भाऊ इंगळे*  यांनी  सुनील विठ्ठलराव शिरसाट यांच्या राहते घर बार्शीटाकळी येथे जाऊन सांत्वन पर भेट दिली. आणि या दुःखातून शिरसाट परिवार लवकरात लवकर सावरेल अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांची चर्चा करून त्यांना धीर दिला. आणि वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते तुमच्या दुःखात सामील आहेत असे देखील बोलल्या. या सांत्वन पर भेटी दरम्यान प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या स्वागतासाठी वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, शहर अध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक तथा गटनेते सुनील विठ्ठलराव शिरसाट, शहर महासचिव शुभम इंगळे, माजी नगर सेवक श्रावण भातखडे, माजी नगरसेवक नशीम खान मास्टर,
ता प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, उज्वल खाडे, अमित तायडे,दादाराव जामनिक, धम्मा जामनिक
शेखर अनिल शिरसाठ
शैलेष सुनिल शिरसाठ
विशाल अशोक खडे
कैलास मोहोड आदी कार्यकतें उपस्तित होते
0 9 4 8 3 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *