धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.—प्राप्त माहिती नुसार ईसोली ग्रामपंचायतचा नियोजन शून्य कारभारामुळे ईसोली गावाला १५ ते २० दिवसा ला , सुद्धा नळाचे पाणी येत नसून .त्यामुळे पाणी टंचाईचा सामना गावातील सर्व नागरिकांना करावा लागत आहे. दिवाळीचा सण,हा, एका दिवसावर येऊन टेकला असून गावातील नळ हे २० दिवस येत नाही. मुंगी पाझर तालावरुन पाणीपुरवठा होतो तिथे भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीसुद्धा पाणीपुरवठा करण्याची दोन पाईपलाईन आहेत. बारा, हॉर्स पॉवरच्या पाच मोटरी ग्रामपंचायतकडे आहे. भरपूर कर्मचारी उपलब्ध असून .विहिरीवर स्वतंत्र विद्युत पुरवठा करण्यासाठी डीपी आहे. या सर्व सुविधा उपलब्ध असून सुद्धा ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशी खंत चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. समाधान भाऊ सुपेकर दामू अण्णा येवले रायकर यांनी ईसोली ग्रामपंचायत धडकलेल्या घागर मोर्चामध्ये व्यक्त केला आहे. इसोली येथे ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बहुसंख्य महिला व गावातील नागरिकांच्या उपस्थित रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत वर मोर्चा काढण्यात आला असून. मडके फोडत निषेध करण्यात आला आहे. या मोर्चाचे संचालन श्याम सावंत, यांनी तर प्रास्ताविक विजय गीते यांनी केले आहे. या मोर्चात गावातील बहुसंख्य नागरिक व महिला यांनी सहभागी घेतले होते. ग्रामपंचायत सचिव सरपंच यांना निवेदन देत कडेकोट पोलीस बंदोबस्त मोर्चा काढला यावर येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत काय उपाययोजना करणार, व पाणी टंचाई कशी दूर करणार, याकडे सर्व, गावकरी, व माता-भगिनी यांचे लक्ष लागलेले आहे.
Users Today : 8