प्रतिनिधी :-दि.10/11/2023
दिवाळीचा सण दोन दिवसांवर आला, गावात २५ दिवस नळ येत नाही, मुंगी पाझर तलावावरून पाणीपुरवठा होतो, तिथे भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे, तिथून पाणीपुरवठा करण्यासाठी दोन पाईपलाईन आहेत, बारा हॉर्सपॉवरच्या पाच मोटरी ग्रामपंचायतकडे आहेत,भरपूर कर्मचारी आहे, विहिरीवर स्वतंत्र विद्युत पुरवठा करण्यासाठी डीपी आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे, उपमुख्यमंत्र्याचे,ऊर्जा मंत्राचे पी ए आमदाराचे पती आहे, इसोली सरपंच, ग्रामपंचायत भाजपा ची आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य गलथान कारभारामूळ 25-30 दिवस नळाला पाणी येत नाही, हे संपूर्ण पाप निष्क्रिय, निकामी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामूळे पाणीटंचाईचा सामना गावातील सर्व नागरिकांना करावा लागत आहे, अशी प्रतिपादन चिखली तालुका कॉग्रेस कमेटी चे अध्यक्ष समाधान सुपेकर, खपके साहेब,दामुअण्णा येवले, रायकर सर यांनी इसोली ग्रामपंचायतवर धडकलेल्या घागर मोर्चात भावना व्यक्त केल्या
इसोली येथे ग्रामपंचायत च्या नियोजन शून्य गलथान कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत रिकाम्या घागरी डोक्यावर घेऊन, मिरवणूक काढत,ग्रामपंचायत समोर मडके फोडत निषेध व्यक्त करत,”पाणी आमच्या हक्काचे….नाही कुणाच्या बापाचे”, “सून म्हणे सासूला…पाणी नाही नळाला…..कशी जाऊ मी कामाला” असा एलगार करत उन्हाळा लागण्या आधीच पाणी टंचाईला कंटाळून नागरिकांचा उद्रेक होऊन स्वयं स्फूर्तीने मोठ्या संख्येने घागर मोर्चा ग्रामपंचायत वर धडकला
या मोर्चाचे संचालन शाम सावंत यांनी केले तर प्रास्ताविक विजय गित्ते यांनी केले व आभार ज्ञानेश्वर पचांगे यांनी मानले, यावेळी मोर्चामध्ये शेख,मोबीन भाई,कडु लाला, डिगांबर शेळके,सुभाष आटोळे,शहीद भाई ,विकास शेळके ,अशोक घनगाव,सदाशिव धनगाव, नारायण कानडे, शाम गीते, सुनील शुक्ला, शेषराव गवई,दिपक गवई, सतिष मोरे,शे इरफान, अमोल मोरे, गजानन घनगाव, रामदास घोलप, बिस्मिल्ला भाई, लतीफ लाला, सुमित गवई, बिस्मिल्ला भाई, तुकाराम गायकवाड,माधव खंडागळे,हसन भाई,रशीद भाई, रामकृष्ण पोपळघट,उपवास गवई, रमेश पचांगे,विठोबा गित्ते, विठ्ठल येवले, राजाराम येवले, राजीक पठाण, अशोक गवई वसता मोरे,पवन भाडाईत,माधव लाड यांच्या सह गावातील बहुसंख्य नागरिक व महिला मोर्चासाठी उपस्थित होते, ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना निवेदन देत कडेकोट पोलिस बंदोबस्तात मोर्चा काढला,यावर येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत काय उपाय योजना करणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत.
इसोली ग्रामपंचायत वर पाण्यासाठी धडकला गावकऱ्यांचा घागर मोर्चा
0
9
4
8
3
6
Users Today : 8
Leave a comment