महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक या पदावर 27 वर्षे सेवा देत नुकतेच सेवानिवृत्त झालेले केळवद येथिल रहिवाशी सुपडू रावजी कोर्‍हाळे यांचा शिवसेना शाखा केळवद तथा बुलडाणा जिल्हा युवा सेनेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात येवून त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Khozmaster
2 Min Read
प्रेस नोट
चिखली :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक या पदावर 27 वर्षे सेवा देत नुकतेच सेवानिवृत्त झालेले केळवद येथिल रहिवाशी सुपडू रावजी कोर्‍हाळे यांचा  शिवसेना शाखा केळवद तथा बुलडाणा जिल्हा युवा सेनेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात येवून त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिलभाऊ खेडेकर हे होते. तर युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कर्‍हाडे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुपडू रावजी कोर्‍हाळे यांनी सामान्य परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला दिशा दिली. आज त्यांचे दोन्ही मुले भारतीय सैन्यदलात देशसेवा करीत आहेत. देशसेवेचे व समाजाची सेवा करण्याचे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबावर करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे  यांनी भेट देवून सुपडू कोर्‍हाळे यांचा सत्कार केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपीलभाऊ खेडेकर, युवसेना जिल्हाप्रमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदुभाऊ कर्‍हाडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कौतीकराव जाधव, शिवसेना युवानेते नंदू पाटील, गणेशभाऊ जाधव, शिवाजी पंडीत, युवासेना उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, विधानसभा संघटक हरी इंगळे, शहरप्रमुख आनंद गैची, सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भोकर गावचे सरपंच लताबाई गजानन फोलाने, गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, आजी-माजी सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख तथा पदाधिकारी व गांवकरी मोठ्या संख्येने हजर होते.

0 9 4 8 3 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *