छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.९/११/२३ पासून आनंदाचा शिधा वाटपाला रेशन दुकानदार शुभम गोंडबे व वैभव गोंडबे यांनी सुरुवात केली आहे तरी सर्वानी आनंदाचा शिधा घेऊन जावे असे आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी यंदाही दिवाळी राज्यातल्या नागरिकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला यामध्ये दोन नव्या पदार्थही वाढवली पूर्वी चार वस्तू यामध्ये साखर तेल – चणाडाळ रवा यासारखे जिनस होते आता नव्याने मैदा आणि पोहे याचाही समावेश शिंदे सरकारच्या वतीने करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यातील शीत पत्रिका धारकांना शिंदे सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा दीपावली सणा निमित्त देण्यात आला.आनंदाचा शिधा याची वाटप करण्याचे सूचना सरकार बतीने देण्यात आल्या सावळदबारा गावातील शुभंम गोंडबे यांच्या रेशन न दुकानांमध्ये ता.९ रोजी शेख मुनाफभाई सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करून म्हणाले की, सोयगाव तालुक्यातील रेशन दुकान चालकांनी कुठलीही हयगय न करता आनंदाचा शिधा सर्वांना वितरित करावा गावात कोणीही यापासून कोणी मुकणार नाही याची खबरदारी घ्यावी
आनंदाचा शिधा वाटप करावा सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी गोड करावी कोणत्याही रेशन दुकानाने हायगीय करण्यात येऊ नये त्याची गय केली जाणार नाही याची रेशन दुकानदाराने दखल घ्यावी अशी माहिती सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे व पुरवठा अधिकारी नाना मोरे यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 8