पहूर येथे विद्यार्थी दिन साजरा,विद्यार्थ्यांनी विद्याव्रती व्हावे -शंकर भामेरे

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . ८ ) मनुष्य हा आजन्म विद्यार्थीच असतो ,  आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आपण काही तरी नवीन शिकतच असतो .डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्याव्रताचा वसा आयुष्यभर जपला .  विद्यार्थ्यांनी  विद्याव्रती  व्हावे ,  असे आवाहन बालरक्षक शंकर भामेरे यांनी केले .  महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते .
   ७ नोव्हेंबर हा दिवस डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या पार्श्वभूमीवर मंगळवारी शाळेत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
    कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही .घोंगडे यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले . याप्रसंगी शाळेचे वरिष्ठ लिपिक प्रकाश जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यास शालेय गणवेश भेट दिला . यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले .
प्रतिनिधिक स्वरूपात भाग्यश्री नंदलाल मिस्त्री आणि मंगल ज्ञानेश्वर भील या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे  यांनी सन्मानित केले .
   या वेळी उपमुख्याध्यापिका के . ए . बनकर , ज्येष्ठ शिक्षीका एम . एच . बारी यांच्या सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . बी . एन . जाधव यांनी आभार मानले .
0 9 4 8 3 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *