मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार? मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर: बीडमधील हिंसाचाराशी मराठ्यांचा काहीएक संबंध नाही. त्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी केली. असाच अन्याय सुरू राहिला तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. ते अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी पत्रकारांशी बोलत होते.मराठा आरक्षणासाठी उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर येथील खासगी इस्पितळात दहा दिवस उपचार करण्यात आले. रविवारी त्यांना सुट्टी मिळाली. आज, बुधवारपासून त्यांचा दहा दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.ते म्हणाले, आम्ही सरकारशी मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याबाबत कालबद्ध कार्यक्रमानुषंगाने चर्चा केली आहे. राज्याच्या विविध भागांत मराठ्यांवर सुरू असलेल्या अन्यायाविरुद्धही सरकारला सांगितले आहे. मराठा समाज शांततापूर्ण आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मात्र त्यांना त्रास दिला जात आहे. पोलिसांकडून अटकसत्र सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सात हजार व्यक्तींची आरोपी म्हणून यादी तयार केली आहे. आंदोलन दाबण्यासाठी कितीही दबाव आला तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

0 9 4 8 3 0
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *