हिंगोली : हिंगोली – नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आणि फरशा नेणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तब्बल १५० मेढ्यांचा देखील या अपघातात जीव गेला आहे.
सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसानी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी चार जणांचा डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सध्या जखमी झालेल्या मेढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत.
Users Today : 64