Delhi Judicial Service Exam And Recruitment 2023 Notification : दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, delhihighcourt.nic.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार तपशीलवार वेळापत्रक तपासू शकतात. दिल्ली न्यायिक सेवा पूर्व परीक्षा २०२३ (Delhi Judicial Service Exam 2023) १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १.३० यावेळेत होणार आहे.
पद भरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ५३
आरक्षणानुसार रिक्त जागांचा तपशील :
- सर्वसाधारण: ३४ पदे
- SC: ५ पदे
- ST: १४ पदे
अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२३
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- भारतात वकील म्हणून सराव करणारी व्यक्ती.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- वकील म्हणून सराव करत आहे.
- अधिवक्ता कायदा १९६१ अंतर्गत वकील म्हणून पात्र.
वयोमर्यादा :
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय १८ ते ३२ वर्षांमध्ये असावे.
- दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा २०२३ भरती नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
1. खुला – १८ ते ३२ वर्षे
2. ओबीसी – वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट
3. मागासवर्गीय – वयोमर्यादेत ५ वर्षे सूट
अर्ज शुल्काविषयी :
सामान्य / खुला/ ओबीसी/ EWS : १५०० रुपये
राखीव (मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD) : ४०० रुपये
निवड प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे :
० प्रिलिम्सची लेखी परीक्षा
० मुख्य लेखी परीक्षा
० मुलाखत
० दस्तऐवज पडताळणी
० वैद्यकीय चाचणी
मिळणार एवढा पगार:
उमेदवारांना ७७ हजार ८४० ते १ लाख ३६ हजार ५२० रुपये पगार दिला जाईल.
याप्रमाणे अर्ज करा:
– delhihighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– मुख्यपृष्ठावर, “दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा-2023 साठी ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा.
– त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
– नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
– फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा.
काही महत्वाच्या लिंक्स :
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
Users Today : 59