अकोला प्रती – गेल्या २५ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री यांनी या आंदोलनांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या द्वारा पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.या कर्मचान्यानी दिनांक 25/10/2023 पासून पुकारलेल्या बेमुदत आंदोलन कडे व त्यांच्या न्याया मागण्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत अंतर्गत कार्यरत कंत्राटी असल्याचा आरोप हे कर्मचारी करत आहेत हे कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये सन 2005 पासून ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, महानगरपालिका, नगरपरिषद UPHC, UHC, PHC उपकेंद्र स्तरावर लसीकरण कार्यक्रम, क्षयरोग कार्यक्रम, कृष्डुरोग कार्यक्रम PCPNDT अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, IDSP DOAC, SNCU, डायलिसिस, डाएट NRC, JSSK DEIC या ठिकाणी ANM,SN, औषध निर्माण अधिकारी, RBSK MO, CHO, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, DCM BCM, IFM,DEO, Accountant, समुपदेशक, जिल्हा/तालुका स्तरीय पर्यवेक्षक, Co-ordinator, कार्यक्रम सहाय्यक, इत्यादी विविध पदावर अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. या कर्मचारी अधिकारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन गेल्या २० दिवसापासून सुरू असून 1) लसीकरण 2) NCD रुग्ण 3) कुष्टरोग 4) क्षयरोग 5) नवजात शिशू कक्ष सेवा 6) गरोदर मातांच्या सेवा व प्रसूती 7) DEIC 8) NRC 9) SAM MAM बालकांच्या सेवा 10) RBSK कार्यक्रम अंतर्गत सेवा, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया इत्यादी सेवा प्रभावित झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा व सर्व कर्मचारी अधिकारी यांना न्याय द्यावा व ग्रामीण भागातील रुग्णांला होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी अन्यथा हे आंदोलन जन आंदोलन होऊन कर्मचारी व अधिकारी यांच्या सहन शिलतेचा उद्रेक होऊन होणाऱ्या परीणामाला महाराष्ट्र शासन जबाबदार राहिल यांची नोंद घ्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे
Users Today : 59