“सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टेबहादूर यांच्या पुढाकारातून फटाके मुक्त दिवाळी युवकांनी केली साजरी”

Khozmaster
2 Min Read
वाशिम जिल्हा प्रतिनिधी;
 “देणाऱ्याने देत जावे..!  घेणाऱ्याने घेत जावे..! एक दिवस देता देता..! देणाऱ्याचे हात घ्यावे..!!”   या ओळीप्रमाणे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या मूलमंत्र्यातील दिलेल्या संदेशाला अंगीकारत यावर्षी वाशिम येथील तरुण युवक युवती व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रदीप पट्टेबहादूर युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त भारत सरकार यांच्या पुढाकारातून यावर्षी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून वाशिम शहरातील गोरगरीब तसेच पालावर राहणाऱ्या आणि आपल्या कष्टातून आपल्या पोटाची खळगी भरून  कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासोबत तसेच रस्त्यावरील वृद्ध भटके बेवारस नागरिकांना व महिलांना साडी चोळी ब्लॅकेट चादर आणि फराळ किट देऊन या सर्वांची दिवाळी गोड केली आहे. या पर्यावरणामध्ये  होत चाललेला बदल आणि प्रदूषण हे लक्षात घेऊन यावर्षी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता हा एक उपक्रम यावर्षी सुरू केला आणि फटाक्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्याकरिता संकल्प करून हे सामाजिक उपक्रमाची सुरुवात प्रदीप पट्टेबहादूर यांच्याकडून करण्यात आली. याकरिता वाशिम  जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तथा आदरणीय गुरुवर्य अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग सर्व मित्रमंडळी यांनी य त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपाची मदत करून या सामाजिक उपक्रमाला आर्थिक पाठबळ दिले. उपक्रमामध्ये रूपालीताई  देशमुख , छायाताई पवार , राऊत मॅडम, आकांक्षा  गायकवाड, माहिनी  पठाडे ,साक्षी खोडके,राणी सरकटे, निकिता पट्टेबहादूर, सारीका  गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ग्राम् सदस्य संतोष इंगळे , अतुल राऊत,ऍड. शिवदास राऊत, अशांत कोकाटे,सदेश पवार ,सदानद पट्टेबहादुर , होते,या संपूर्ण उपक्रमाचे  आयोजक  प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले होते.तर या कार्यक्रमाला राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहूद्देशिय् मंडळ केकत उमरा , दत्त प्रभू बहुद्देशीय संस्था वाशिम व तरुण युवक व सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व  मित्र मंडळ  यांच्याकडून विशेष सहकार्य लाभले.
“*दिवाळीचा सण आला ! सर्वांनीच पाहिजे केला ! परंतु पहावा कुणी राहिला ! भुकेला घरी*” –  कर्मयोगी  राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज*
0 9 4 8 1 1
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *