धक्कादायक… भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या

Khozmaster
1 Min Read

यवतमाळ : यवतमाळमध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या केलीये. अज्ञात आरोपींनी शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाला मारलं. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झालाय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेनं यवतमाळमध्ये खळबळ उडालीये.योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृत शिवसैनिकाचे नाव आहे. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. योगेश यांचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे.
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *