ठाणे : दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व तीन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री समोर आला आहे.पाचपाखाडी येथील कचराळी तलावाजवळ सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे, ठाणे पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने ही दुर्घटना नेमकी कशी घडली, पार्किंग सारख्या दाटीवाटीच्या भागात फटाके फोडण्यास परवानगी कोणी दिली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पहावे लागणार आहे.
भिवंडीतील गोदामाची आग सात तासाने आटोक्यात
भिवंडीच्या काल्हेर येथील ओसिया माता कंपाऊंडमध्ये मे. शाम फायबर प्रा. ली. या कापसापासून धागा बनविण्याच्या गोदामाला मंगळवारी राञी आग लागली होती. ही आग सात तासांच्या अथक प्रयत्नांनतर पुर्णपणे विझविण्यात आली.
Users Today : 45