प्रतिनिधी शिवानंद पवार
मेहकर तालुक्यातील गेल्या खरीप हंगामातील अत्यल्प पावसाचे प्रमाण लक्षात घेता दुष्काळात सामावेश करन्यात आला. परंतु असं होताना शासनाकडुन केवळ दोन महसूल मंडळं शेलगांव व कल्याणा ह्यांच्या अंतर्गत येनार्या गावांवर अन्याय करन्यात आला… आणि ह्या दोनही मंडळातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचा आढावा घेतला असता, ह्या ठिकाणी सुद्धा ह्या वर्षी पाउस हा खंडीत व अत्यल्प स्वरुपाचाच पडला ज्यामुळे सोयाबीन पिकांचे उतारे घटुन अगदी दोन-तीन-चार पोते एकरी असे आले… ज्यामधुन सोयाबीन पिकांचा लागवड खर्च सुद्धा शेतकर्यांचा वसुल होनं अवघड झालंय… अशामद्ये शासनाने शेतकर्यांच्या ठामपणे पाठीशी उभं राहुन शेतकर्यांना आधार देनं गरजेचं आहे… परंतु तालुक्याचा दुष्काळामद्ये सामावेश होत असताना केवळ दोन मंडळांना त्याठिकाणी सुद्धा पिकांचं दुष्काळामुळे नुकसान झालेलं असताना त्यांना दुष्काळाच्या यादीतुन वगळने हा शेतकर्यांवर अन्याय आहे…
इतर महाराष्ट्राप्रमाणेच ह्याही मंडळातील शेतकर्यांना दुष्काळी परिस्थितीत शासनाने आधार देनं गरजेचं आहे… त्याचमुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाकार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात मेहकर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करन्यात आले… तसेच त्वरित ह्या दोनही मंडळातील गावांचा दुष्काळग्रस्त म्हणुन सामावेश न केल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा ह्यावेळी देन्यात आला… ह्यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाकार्याध्यक्ष,शेतकरी नेते पांडुरंग पाटील, तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल,ता.सचिव जगदीश एखंडे, तालुका कार्याध्यक्ष नितीन वैराळ, कार्यकारणी सदस्य गजानन पवार, सुनिल वाघमारे,प्रशांत इंगळे,लक्ष्मण पवार,जानु पवार, जगदीश चव्हाण,साहेबराव पवार, भानुदास अजगर,गजानन पवार,माधवराव शेवाळे,शेषराव त्रिकाळ, धनंजय शेवाळे,विशाल शेवाळे, दत्ता मेटांगळे,सिद्धार्थ गव्हांदे,रामेश्वर शेवाळे, सुनिल राठोड,विजय शेवाळे, जगदीश पवार, गोपाल चतरकर,अमोल नरवाडे, आदींसहीत वरुड,विश्वी, शेलगांव, कनका ह्या गावांसहीत दोनही मंडळातील शेकडो अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते…
Users Today : 42