नाशिक: मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत १० प्रवासी भाविक जखमी झाले आहे त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश असून काहींना उपजिल्हा रुग्णालय तर काहींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. चालक अवैध गॅसच्या अड्डयावर गॅस भरण्यासाठी मारुती घेऊन गेला होता गॅस भरत असतांना ही घटना घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथील असल्याची माहिती आहे.
जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे
आदित्य अवचारे (वय 11)
सीमा कसबे
प्रदीप अवचारे
वैभव लिंबे (वय 22)
विराज कसबे (वय 4)
प्रतिभा लिंबे (वय 39)
वैदही कसबे वय (1.5)
अनुष्का कसबे (वय 14)
गीता कसबे वय (22)असे एकूण दहा जणांचा समावेश असून यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती सोनवणे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आर्यन सोनवणे यांनी दिली आहे. घटनास्थळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. याप्रकरणात माजी आमदार मारुतराव पवार, येवला शहराचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम रिजवान मेंबर मुश्रीफ शहा यांच्यासह परिसरातील मुस्लिम नागरिकांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.
Users Today : 26