धोत्रा भनगोजी मन्सूर शहा दै खोज मास्टर न्यूज.-
दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेतकरी एल्गार महामोर्चासाठी आज धोत्रा.भ. येथे बैठक मा. रविकांत भाऊ तुपकर यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली असून.धोत्रा.भ गावात मा. रविकांत भाऊ तुपकर शेतकरी नेते यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या बाबत संपूर्ण माहिती सांगितली असून सोयाबीन कापूस ला भाव मिळाला पाहिजे तसेच आपला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला पाहिजे
तसेच मा. रविकांत भाऊ तुपकर यांनी आपल्या भाषणात बोलताना सोयाबीनला प्रति क्विं ९००० भाव तर कापसाला प्रति क्विं १२,५०० रुपये मिळाले पाहिजे चालू वर्षाचा पिक विमा 100% मिळाला पाहिजे तसेच सध्या शेतीला पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, दूध उत्पादनाला अनुदान मिळाला पाहिजे, या सर्व मागण्या, मान्य, करून घेण्यासाठी मा. रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या होणाऱ्या आंदोलनात सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमजुरांना आवाहन केले आहे.
ज्याप्रकारे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील एक गाव अंतरवाली सराटी हे झाले , सोयाबीन कापूस उत्पादनाचे आंदोलनाचे केंद्रबिंदू बुलढाणा झाले पाहिजे . सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आपण शेतकरी म्हणून एकत्र यावे व मला साथ द्यावी अशी विनंती केली आहे. आणि शेतकऱ्याला न्याय सरकारने दिले पाहिजे यासाठी आपण सर्वांना एकत्रित येऊन. या मोर्चाला यशस्वी करायची आहे. असे भाऊंनी भावनिक आव्हान सर्व शेतकरी शेतमजुरांना केले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय रविकांत भाऊ तुपकर समाधान फाटे पंढरपूर अँड. राहुल घुले मंगळवेढा अँड. सचिन पाडळे पुणे विनायक सरनाईक चिखली कार्तिक खेडेकर चिखली नितीन राजपूत चिखली सुधाकर तायडे भारत वाघमारे इरफान भाई चिखली कृष्णा सपकाळ पत्रकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या बैठकीला आंधई उतरादा ,शेलोडी, शेलसूर, धोत्रा. येथील शेतकरी व शेतमजूरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये प्रामुख्याने, धोत्रा भं. येथील, संदीप उन्हाळे सर रामकृष्ण कापसे ज्ञानेश्वर भोपळे, विशाल कापसे, संदीप मस्के, मन्सूर शहा पत्रकार, ज्ञानेश्वर थोळबरे, व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
Users Today : 25