एजाज खान स्व.इंदिराजी गांधी ह्या जिद्दी ,करारी आणि कणखर नेतृत्ववान धाडसी पंतप्रधान होत्या—–

Khozmaster
2 Min Read
कासम भाई गवळी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी ह्या जिद्दी,करारी आणि कणखर  नेतृत्ववान धाडसी पंतप्रधान होत्या असे उदगार मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांनी स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त के.जी.एन.शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले दिनांक 19 नोव्हेम्बर रोजी स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कासम भाई गवळी हे होते.कार्यक्रमात सुरुवातीला इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळेस पुढे बोलताना कासम भाई गवळी म्हणाले की इंदिराजी गांधी यांनी देशातील सर्व बँकाचे एकीकरण केले.तसेच पंजाब मधील आतंकवादाला लगाम घातला.देशात हरित क्रांती घडविली.गोरगरिबांसाठी अनेक योजना आणून गरिबी हटाव असा नारा दिला.इंदिराजी गांधी सुमारे 17 वर्ष पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आणि देशाला प्रगती पथावर नेले.इंदिराजीच्या काळात भारत देशाने शैक्षणिक तसेच आर्थिक क्षेत्रात  प्रगती केली असेही प्रतिपादन त्यांनी केले
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर दादा गवई यांनी केले तर अडव्होकेट किशोर धोंडगे,प्रल्हाद कानोडजे,डॉ. सुमित धोटे,निलेश मानवतकर  यांनी ही इंदिराजीच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या वेळेस या कार्यक्रमाला भीम शक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोर दादा गवई,अडवोकेट किशोर धोंडगे,मा.नगर सेवक अलीयार खान,हबीब बागवान, संजय ढाकरके,मुजिब हसन कुरेशी,निलेश मानवतकर,निलेश सोमन, प्रल्हाद कानोडजे सर, उत्पन्न बाजार समितीचे संचालक इब्राहिम रेघीवाले,विजय म्हस्के,अनिल चांगाडे, विजय वायाळ,अख्तर कुरेशी,सुरेश मुळे,शेषराव लंबे,युनूस बागवान,ख्वाजा गवळी, महेबूब गवळी,महंमद गवळी,चांद भुरीवाले,इमाम गवळी,सुभान चौधरी,आसिफ पठाण,शामा भवानीवाले,महेमूद भवानीवाले,सुभान भवानीवाले यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र माने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल चांगाडे यांनी केले.शेवटी इंदिराजी गांधी यांना अभिवादन करण्यात  आले
0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *