एक डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या पुर्व नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाची आज बैठक

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मराठा योध्दा पर्वा न करता लढणारे मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या भव्य सभेच्या पूर्व नियोजनासाठी शहरातील

आणि मराठा क्रांती मोर्च मंठा तालुक्याच्या वतीने सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून समन्वयक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, शेतकरी युवक बांधव, विविध सरस्वती मंगल कार्यालय तळणी रोड येथे सकल मराठा समाज सामाजिक संघटना, प्रतिष्ठीत व्यक्ती, कार्यकर्ते यांनी

उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. या बैठकीला समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच सर्व मंठा तालुक्यातील सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांनी व स्वयंसमन्वयक यांनी जास्तीत जास्त संख्येने या बैठकीला उपस्थित राहुन आप-आपल्या सुचना कळवाव्या तसेच पुढील नियोजन समजुन घ्यावे. तसेच या सभेच्या अनुषंगाने सर्व नियोजनाचे जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन देखील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्या मंठा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 7 8 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *