मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला गेले, शॉक लागून तिघांचा करुण अंत; संपूर्ण गाव शोकाकूल

Khozmaster
1 Min Read

वर्धा : वर्धा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील पिपरी मेघे येथे ही घटना उघडकीस आली आहे. येथील तुळजाभवानी मंदिरात कळसावर झेंडा चढवत असताना विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी आठ वाजता ही घडली घटना आहे. तिघे जण मंदिराचा झेंडा लावत असताना झेंड्याचा लोखंडी खांबाचा विद्युत ताराला स्पर्श झाला.

विद्युत ताराला मंदिराच्या झेंड्याचा लोखंडी खांबाचा स्पर्श होताच तिघांना जोराचा विद्युत प्रवाहाचा झटका बसला. मंदिरातील झेंड्याचा खांब हा २५ फूट उंचीचा होता. झेंडा चढवत असताना खांबाचा तोल सुटल्याने शेजारी असलेल्या ३३ केव्हीच्या तारावर तो खांब आणि त्यांना विद्युत प्रवाहाचा झटका बसला. विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघेही मंदिरातील शेडवर जोरात पडले. घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अशोक सावरकर (वय ५५), बाळू शेर (वय ६०)आणि सुरेश झिले (वय ३३) अशी मृतकांची नावे आहेत. या धक्कादायक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *