नेवासा येथे २३ नोव्हेंबर ला मनोज जरांगे यांची जाहीर सभा

Khozmaster
1 Min Read
नेवासा प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर
सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे नेवासे येथे नगर पंचायतिच्या चौकात दि.२३नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती पूर्वतयारी च्या बैठकीत संयोजकांनी दिली.
नेवासा फाटा रोड वरील पावन गणपती मंदिर प्रांगणात श्रीरामपूर येथील मराठा आरक्षण आंदोलक नितीन पटारे यांचे उपस्थितीत सभेच्या पूर्वतयाीसाठी ची बैठक नुकतीच झाली .तालुका व परिसरातून मराठा आंदोलक कार्यकर्ते बाळासाहेब कोकणे,डॉ.किरण घुले,सोमनाथ चिंधे,संभाजी कार्ले,नंदकुमार पाटील, गणेश निमसे,जयवंत मोटे,सतीश गायके,ॲड.बाळासाहेब गरड,ॲड.अशोक कर्डक,ॲड.मयूर वाखुरे,संभाजी गायकवाड,सुनील वाघ,ज्ञा नेश्वर पेचे,बाबा कांगुणे, ह.भ.प.भगवान महराज डिके,बद्रीनाथ चींधे, भरत बेल्हेकर,संदीप दरंदले,दीपक धनगे,डॉ.कोलते,ॲड. एन.बी. अडसुरे,राजेंद्र उंदरे,किशोर जोजार,विलास चव्हाण,गणेश कोरेकर,सुहास पठाडे,नानासाहेब पवार,या वेळी उपस्थित होते. ॲड.के. एच. वाखूरे यांनी प्रास्तविक केले.भाऊसाहेब वाघ यांनी रूपरेषा समजावून सांगितली नितीन पटारे यांनी या वेळी विविध सूचना मांडल्या.अनिल ताके यांनी उपस्थीतांचे आभार मानले या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते
0 9 4 7 7 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *