स्त्री शक्तीचा आदर करणे हाच नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू – डॉ. रामप्रसादजी शेळके

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी, दत्ता हांडे

देऊळगाव राजा- येथील नामांकित शाळा राजलक्ष्मी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव चिमुकल्यांच्या उपस्थित अतिशय जल्लोषात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.रामप्रसादजी रंगनाथराव शेळके यांनी उपस्थित राहुन चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.

आज शाळेत नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व विद्यार्थ्यांनी गरबा मध्ये पारंपारिक वस्त्र परिधान करून उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आणि गरबा आणि दांडिया नृत्याचा आनंद घेतला. यावेळेस शाळेचे सचिव डॉ रामप्रसादजी शेळके मुलांना प्रोत्साहनपर बोलले की, आयुष्यात चांगला मनुष्य बनायचे असेल तर नारी शक्तीचा आदर हा प्रत्येकाने केला पाहिजे तसेच नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा मातेच्या कोणत्या रूपाची पूजा करावी याची माहिती सांगितली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य आदेश शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

0 9 4 5 9 0
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *