धोत्रा भंनगोजी ,मन्सूर शहा.—मुस्लिम शहा फकीर जातीचा भटक्या विमुक्त प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम शहा फकीर संघटनेच्या वतीने दिनांक २१ नोव्हेंबर २०२३रोजी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर १ दिवशीय धरणे आंदोलन करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. तसेच संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन -२००४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये दरवेशी शहा हा शब्द वापरण्यात आला असून २३ मार्च २०११ रोजी च्या परिपत्रकामध्ये छप्परबंद विमुक्त जातीची ओळख म्हणून शहा शब्द वापरणार असे व पूर्वजांच्या नोंदीचा फकीर म्हणून पुरावा देणारे छप्परबंद आहे तसेच १ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयाच्या यादीमध्ये यादी अनुक्रमांक ३३५ वर मुस्लिम फकीर यांना इतर मागासवर्गीयांच्या प्रवार्गा मधून सवलत देण्यात आली आहे .म्हणजेच शहा फकीर दरवेशी छप्परबंद शहा फकीर मुस्लिम धर्मीय या तीन वेगवेगळ्या नावाचे शब्द प्रयोग झालेल्या वेगवेगळ्या जाती नसून फकीर ही मूळ जात आहे हे शासन निर्णयातून वगळण्यात यावे व नव्याने फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये सुधारितपणे करून राज्यातील लाखो मुस्लिम शहा फकीर समाज बांधवांना न्याय देण्याचे काम या सरकारने करावे अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे राज्यातील मुस्लिम शहा फकीर समाज बांधवाकडून प्रचंड स्वरूपात मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे .या निवेदनावर मुस्लिम शाह फकीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- माननीय के.जी शहा .साहेब प्रदेशाध्यक्ष – लुकमान शहा साहेब ,जिल्हा अध्यक्ष तहसील शाह युवा जिल्हाध्यक्ष शहीदशाह विदर्भ कार्याध्यक्ष मन्सूर शहा सरदार शहा जुबेर शहा जमीर शहा बाबा शहा आमिरशहा, महबूबशाह मासूम शहा मस्तान शहा, रफिक शहा, गुलाब शहा, मुसा शहा, हजा शहा, जिया शहा, सलीमशहा नजीरशहा गुलजामा शहा सलमानशहा, आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 16