अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा तीव्रपाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे, गेले १० ते १२ दिवसापासून पिण्याचा पाण्या पासून वंचित राहत आहेत. मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.तालुक्यातील खेड्यांमध्ये रस्त्याची समस्या मोठी गंभीर स्वरूपाची आहे.तसेच गावांत विविध समस्या आहेत. नेहमीच चे पाईप लाईन फुटणे, वाल लिक होणे असा समस्या ना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रकारच्या समस्या मुळ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दूषित होऊन आरोग्यास अपायकारक पाणी निघत आहे. तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. बरेच कुटुंबे पिण्याचे पाणी शुध्द करण्यासाठी वॉटर फिल्टरचा उपयोग करतात. सध्या उपलब्ध असलेले बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्यामुळे आणि त्याच स्त्रोताचे पाणी उपयोगात येत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना पोटाचे विकार, गॅस, एसीडीटी, मुतखडा, अपचन आदी आजार बळावत आहेत. मात्र या प्रकाराकडे कुणीच लक्ष पुरवित नाहीत. त्यासाठी नागरिक वारंवार तक्रार करीत आहे. मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रतिनिधी अशोक भाकरे मोरगाव भाकरे
Users Today : 12