वैष्णवशिव एकरुप
कार्तिकी शुद्ध दिनी
घडलासे महा योग
एकादशी प्रबोधिनी
होई जागे शुभदिनी
विष्णू योग निंद्रेतूनि
चातुर्मास रे सुसंपन्न
घडले पुण्य हातूनि
देव उठी एकादशी
नाम दुजे देवोत्थनी
रमतो पुन्हा युगांधर
श्रीहरी सृष्टी पालनी
बेलपत्र वाहू शकतो
आज रे विष्णूचरणी
तुलसी पत्र प्रिय तम
धारतो तो शूलपाणी
हरि हराची भेट होई
भेदा भेद नको मनी
भक्ती रसा लीन होई
सांप्रदायसिमोलंघनी
तुलसीविवाह आरंभ
चालतो आजपासूनि
व्रतस्थ राही हरिदास
Users Today : 16