प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पांढुर्णा:- पातूर तालुक्यांतील पांढुर्णा येथिल थायलंड , लाऊस देशांमधून आलेल्या, भंतेइंथेनोंग फोनव्होंग , भदंत बोधिशील, भंते करूनासगर ,भंते धम्म सेवक पांढुर्णा भंते यांचे गावामधे जंगी स्वागत करण्यात आले मुख्य गावाला भेट देण्याकरिता अलेले भंते, माताश्री मेसी यांची गावांमधून भव्य रॅली काढण्यात आली व नंतर त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजा रोहन करण्यात आले, व गावाती सर्वांच्या हस्ते त्यांना भोजन दान करण्यात आले, व महा परित्रण पाठ करण्यात आले त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याचे विचाप्रवर्कट प्रकट केले व इतर भंते त्यांनी ते प्रवचनाच्या मध्यापातून सांगितले, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्य तत्वाचा आपणकश्या प्रकारे वापर केला पाहिजे व त्यांनी सांगितलेल्या विचारांचा आपण कसा अवलब केला पाहिजे भदंत बोधीशिल, भंते करूनसागर भंते धम्म सेवक यांनी सुद्धा आपले विचार प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केले ,सदर कार्यक्रमाला ,विश्र्वशांती महीला संघ, पंचशील मंडळ, भीम टायगर संघाने परिश्रम घेतले
Users Today : 12