विक्रमी खेळाडू ..

Khozmaster
1 Min Read
विश्व विक्रम करतो
एखादं उमदा घोडा
आव्हान  दे सर्वांना
विक्रम माझा मोडा
कौतुक शुभेच्छांचा
अंगणी पडतो सडा
टीकाकार होई थंड
भलता जरी तुसडा
रसिक प्रेक्षकी गर्दी
भोवताली पडे वेढा
सेल्फी फोटो घेण्यां
चाहता प्रत्येक वेडा
मुलांच्या पायामध्ये
योग्य बसतो जोडा
बापाला अतिखुशी
भरवी स्वताचं पेढा
प्रतिस्पर्धी पोट दुखे
ढसाढस डोसे सोडा
कधी खुले करा मन
दुराग्रहदुश्मनी सोडा
दुश्मन बनतात मित्र
विसरू जाई  झगडा
बदलून टाके भविष्य
खेळाडू  तोचि तगडा

हेमंत मुसरीफ पुणे
  ९७३०३०६९९६
0 9 4 7 7 3
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *