घरात नवरा-बायकोचा वाद, पत्नीचं टोकाचं पाऊल, दोन चिमुकल्यांसह धरणात उडी

Khozmaster
1 Min Read

 हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण गाव शिवारात पती पत्नीचा कौटुंबिक वाद चिघळला आणि पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं. काही क्षणात आईने रागाच्या भरात मुलांना धरणाच्या पाण्यात टाकून दिले. मुलांना आई आपल्याला असं पाण्यात टाकून देणार आणि आपली निर्दयी हत्या करणार आहे, अशी कल्पना देखील मुलांना आली नसावी आणि पाठोपाठ आईने देखील पाण्यात उडी घेतली. मुलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तर आईला गावातील नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.पती अमोल खंदारे व अमृपाली खंदारे असं या पती पत्नीचे नाव असून यामध्ये पती पत्नीच्या भांडणात हिंसाचाराच्या घटनेतून स्वतःच्या आईने दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन ईसापुर धरणामध्ये उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तर आईला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. मृत मुलांमध्ये ३ वर्षाचा प्रणव खंदारे आणि ५ वर्षीय आरुष खंदारेचा समावेश आहे.दरम्यान, पोलिसांनी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढत कळमनुरीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते. तर रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. रात्री उशीराने मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेतील चिमुकल्याच्या आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत सध्या तरी कळमनुरी पोलीसात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे.

0 9 4 7 7 3
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *