केसरकरांचं पत्र, वडेट्टीवारांचं टीकास्त्र, तुषार दोषींची पुन्हा बदली, गृह विभागानं तीन दिवसात निर्णय फिरवला

Khozmaster
2 Min Read

पुणे : मराठा आरक्षणासाठी जालना येथे झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आलेले जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात पुणे लोहमार्ग अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली होती.

राज्य गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी बदलीचे आदेश काढले. जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. दोशी यांची सीआयडीच्या अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर दोशी यांची लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली.

दीपक केसरकरांच्या पत्रानंतर तर्क वितर्क

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या २० नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आल्या होत्या. या पोलीस अधिकाऱ्यांपैकी जालन्याचे माजी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या बदलीवरुन राजकारण रंगलं होतं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी २० नोव्हेबंरलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी करणारं पत्र लिहिलं होतं. ते पत्र गुरुवारी माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं. यासंदर्भात दीपक केसरकर यांनी त्यांचं काम विनंती करण्याचं असून तुषार दोषींच्या बदलीचं काय करायचं हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता तुषार दोषींच्या बदलीचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रिम पोस्ट’वर बदली मिळाली, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?

अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.

0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *