धोत्रा.भनगोजी.मन्सूर शहा, दि.२५/११/२०२३.--“सरकार हमचे डरती है इसीलिए पोलीस को आगे करती है”याच प्रमाणे.आज मा. रविकांत भाऊ तुपकर यांना पोलिसांनी अटक केली. असून त्यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, कापूस यांच्या आंदोलनासाठी २९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा ताबा घेण्याचा इशारा यांनी आंदोलनात देण्यात आले होते. आणि त्यात पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी मा. रविकांत तुपकर, यांना अटक केली त्या दरम्यान सर्व लाईव्ह चालू असताना सोमठाणा व पळसखेड , अशा अनेक गावातून त्यांना, फोन आले,आणि, सोमठाणा, येथील विद्या वाघमारे या भगिनी चा फोन आला व त्यांनी या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ आपण आपल्या दोन्ही मुलासह विहिरीत उडी घेत आहोत असे सांगितले परंतु मा. रविकांत भाऊ यांनी आपली भगिनी विद्या वाघमारे ची समजूत काढून त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली तसेच पोलिसांनी मा. रविकांत भाऊ तुपकर यांना कोर्ट समोर हजर केले असता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला असून. तसेच सोमठाणा या गावात जाऊन ते विद्या वाघमारे या भगिनीची भेट घेऊन सोमठाणा या गावापासूनच आपले ” अन्न त्याग “आंदोलन सुरू करून आंदोलनाची केंद्रस्थान सोमठाणा,हे गाव असणार असून संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे. अशी प्रतिक्रिया माननीय रविकांत भाऊ तुपकर यांनी कोर्टाच्या बाहेर जामीन मंजूर झाल्यानंतर . प्रसार माध्यमांना दिली आहे.
Users Today : 14