सांगली : सांगलीच्या पाण्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात वाद चिघळला आहे. पाण्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आडमुठी भूमिका घेऊन सांगली जिल्ह्यावर अन्याय केला आहे. मसुदा समिती मध्ये घेतलेल्या ठरावावर सही न करता शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दमबाजी करत चुकीची भाषा वापरल्याचा आरोप सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर शंभूराज देसाई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. यामध्ये सुधारणा झाली नाही तर खासदारकी पणाला लावू ,वेळप्रसंगी खासदरकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
खासदारकी पणाला लावून वेळप्रसंगी खासदरकीचा राजीनामा देणार : संजयकाका पाटील
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाणी सोडण्याबाबतचे त्याचबरोवर इतर अधिकार तातडीने काढून घेण्यात यावेत. इथून पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश द्यावेत. याबाबत शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करू नये. कोयना धरण काय त्यांच्या मालकीचे केले नाही. वेळप्रसंगी खासदारकी पणाला लावून तक्रार करूनही यांच्यात सुधारणा झाली नाही तर खासदरकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, माझे कोणत्या दलालीचे धंदे नाहीत, माझे बदल्यांवर काम चालत नाही असा टोलाही त्यांनी देसाई यांना लगावला आहे.दरम्यान, कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी दोन टीएमसी पाणी काल रात्री सोडण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती.
Users Today : 28