मळसुर: पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदी विजय चव्हाण यांची वर्णी लागली आहे. गेल्या दोन वर्षापासून चान्नी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदावर कार्यरत असलेले ठाणेदार योगेश वाघमारे यांची दहीहंडा पोलीस स्टेशनला बदली केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी २८ नोव्हेंबर रोजी काढले आहे. ठाणेदार विजय चव्हाण हे अकोला येथे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, तसेच त्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनचा सुद्धा कारभार पाहिला आहे. अखेर त्यांची चान्नी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी वर्णी लागली असून, २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी चान्नी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून, योगेश वाघमारे यांनी दहीहंडा ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.