प्रतिनिधी:- शिवाजी उदार
दिनांक:-29/11/2023
मेरा खुर्द:- मेरा खुर्द परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.या परिसरात रविवारी व सोमवारी अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.अगोदरच खरीप पिकांमध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कमी उत्पादन त्यावरून मालाला कमी भाव त्यामुळेशेतकऱ्यांचे कंबरडी मोडले आहेत.आणि आता हे अस्मानी संकट त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे.या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, कपाशी, तूर ,शाळू, मक्का या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी जवळ जमा असलेली माय पुंजी खर्च करून रब्बीची पेरणी केली आता मात्र नशिबाने तोंडी आलेला खास हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या आहे.या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरसकट मध्ये जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
Users Today : 14