नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे.
छत्रपती शिवाजीराजे यांची पुरोगामी विचारधारा असलेल्या महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊंच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्हयातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात दि. २३नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारच्या वेळी एका नराधमाने गावातील एका निरागस अडीच वर्षीय बालिकेला चॉकलेटच्या बहाण्याने एका बंद व पडक्या घरात नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून तिला रक्तबंबाळ केले. दरम्यान ती बेशुद्ध पडली त्यानंतर तिला दगडाने ठेचुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. बालिका घरी परत आली नसल्याने तिची शोधाशोध केली असता ती पडक्या घरात रक्तबंबाळ व बेशुद्ध अवस्थेत आढळली. दरम्यान तिला बुलढाणा येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे समजले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन समाजमन सुन्न करणारी आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. व मा. गृहमंत्री महोदय, आपणास विनंती करतो की, या घटनेची तात्काळ दखल घेऊन विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करुन ही केस जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीला कठोर अशी फाशीची शिक्षा मिळावी. जेणे करुन समाजात भविष्यात अशी निच व दृष्ट प्रवृत्ती उदयास येणार नाही. सदर निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी.या आशयाचे निवेदन सकल मराठा समाज नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने राज्याचे गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.यावेळी बहुसंख्य सकल मराठा समाज उपस्थित होता.सदर निवेदनाच्या प्रतीलीपी मा. पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा,मा. जिल्हाधिकारी बुलढाणा, बुलढाणा. मा. जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. राष्ट्रीय महिला आयोग, बुलढाणा, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन बोराखेडी ता.मोताळा जि.बुलढाणा. यांना देण्यात आल्या.
Users Today : 35